हिंदु धर्म सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न करनारे स्वामी विवेकानंदापासून ते डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या संयुक्त स्मृतिला विनम्र अभिवादन करून पुढील मजकूर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे !
स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत दिलेल्या भाषणाला या वर्षी 130 वर्षे होत आहेत ! तेंव्हा डॉ. आंबेडकर दोन वर्षे पांच महिने वयाचे होते !
11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेत कोलंबस ने अमेरिकेत प्रवेश केल्याच्या घटनेला चारशे वर्षे पूर्ण झाली म्हणून, अमेरिकेने 1893 साली प्रचंड औद्योगिक प्रदर्शन व त्याच्या जोडीला सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, कला, साहित्य, दर्शन शास्त्र, संस्कृति इत्यादि विषयावर वर्षभर चालणार प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते व त्याच्या जोडीला प्रोफेसर राईट हार्वर्ड विद्यापीठाच्या भाषाशास्त्र इतिहास संशोधन, आणि ग्रीसचा इतिहास या तीन विषयांचे प्राध्यापक व विद्वान यांच्या मुळे सर्वधर्म संसदेचे पण आयोजन करावे म्हणून आग्रह धरला होता. आणि त्यांच्याच शिफारसपत्रा मुळे, व्यासपीठावर, स्वामी विवेकानंदांना जागतिक स्तरावरून प्रथमच बोलण्याची संधी मिळाली !


स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेत सर्वधर्म परिषदेत दिलेल्या भाषणाच सार “धर्म, पंथ, आणि संप्रदाय यांच्या दुराभिमानापोटी आजवर अनेकदा हे जग मानवी रक्ताने न्हाऊन निघाले आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीचा विनाश झाला आणि अनेक समृद्ध राष्ट्रे नामशेष झाली लक्षात घ्या, जगातील सर्वात समृद्ध अशा संस्कृत भाषेत exclusion पूर्ण पणे वगळणे हा शब्द नाही. कोणत्याही भाषेत, संस्कृतीत वा धर्मात तो असता कामा नये ” सकाळी परिषदेचे उद्घाटन करताना जगातील प्रमुख दहा धर्मांची आठवण म्हणून दहा प्रचंड घंटानाद केले होते. त्याचा उल्लेख करून विवेकानंद म्हणाले ” सकाळी जे घंटानाद झाले त्याचा अर्थ समजावून घ्या. सर्व धर्म परिषद धर्मवेडेपणाची मृत्युघंटा आहे. तलवार आणि लेखणी यांच्या साहाय्याने माणसांच्या केल्या जाणाऱ्या सर्व छळांचा अंतिम क्षण जवळ आलाय ” विवेकानंद फक्त पाच मिनिटे बोलले. वाक्यावाक्याला श्रोते टाळ्या वाजवित होते ! आणि भाषण संपले त्यावेळी पुन्हा दोन मिनिटे टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. – त्या एका भाषणाने विवेकानंद अमेरिकेत आणि भारतातही सर्वत्र माहीत झाले. केवळ माहीतच झाले नाहीत, त्यांच्याभोवती अद्भुतेचे एक वलय निर्माण झाले !


हे दत्तप्रसाद दाभोळकर यांनी लिहिलेल्या विवेकानंद : एक महामानव या पुस्तकातील पान नंबर 41 वरून मी हे सगळं लिहिले आहे ! कुणाच नांव नरेंद्र आहे म्हणून व त्यांच्या भगव्या कफनी वरून काही हिंदुत्ववादी मंडळींनी ज्या पद्धतीने हिंदु धर्मात गेल्या काही वर्षांपासून जी Axclusion ची कल्पना संपूर्ण देशात राबविण्याची सुरू केली आहे ! म्हणजे इतक्या वर्षांपूर्वी स्वामींनी दिलेल्या इशाराही या मंडळींना समजला नाही ? तर नुसते भगवे कपडे व त्यांच्या फोटो वा मूर्त्या उभारून फक्त धर्माधर्मात द्वेष पसरवून आपली राजकीय पोळी भाजून देशाचे केवढे मोठे नुकसान करत आहेत ! म्हणजे सर्वधर्मपरिषदेत दिलेल्या इशारा ” धर्म, पंथ आणि संप्रदाय यांच्या दुराभिमानापोटी आजवर अनेकदा हे जग मानवी रक्ताने न्हाऊन निघाले आहे. त्यामुळे मानवी संस्कृतीचा विनाश झाला आणि अनेक समृद्ध राष्ट्रे नामशेष झाली – लक्षात घ्या जगातील सर्वात समृद्ध अशा संस्कृत भाषेत exclusion पूर्ण पणे वगळणे हा शब्द नाही. कोणत्याही भाषेत, संस्कृतीत वा धर्मात तो असता कामा नये ” आणि नेमके भारतात सध्या हेच सुरू केले आहे ! आणि तेही राष्ट्रीयत्वाची कल्हई लावून चालू आहे ! आणि नेमके स्वामी विवेकानंदांच्या नांवाने उदोउदो करणारे तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी आत्ता अत्यंत उन्मत्त होऊन अल्पसंख्यक समाजा बद्दल ज्या पद्धतीने हिंसा फैलावणाऱ्या भाषेत बोलत आहेत हे काय स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेत दिलेल्या भाषणा पासुन काही एक धडा न घेता त्याउलट वागत – बोलत आहेत !
एखाद्या मद्यधुंद माणसाप्रमाणे त्यासाठी कुणाला धरून सिनेमा बनवून व त्याच्या आडोशाने संपूर्ण देशात बेदिली माजवली जात आहे ! कालच दिल्ली येथे बरारी मैदानावर आयोजित हिंदु महापंचायत मधे झालेल्या भाषणांची क्लिपिंग पाहून मला वरील मजकूर लीहायची प्रेरणा झाली ! कोण नरसिंहानंद नावाचा भगवे कपडे घातलेल्या माणसाने ज्या पद्धतीने भडकावणारे भाषण दिले ! आणि हा माणूस असेच भडकावणारे बोलल्या मुळे तुरुंगातून नुकताच जमानतीवर बाहेर आला आहे ! सगळ्यात आस्चर्य म्हणजे दिल्ली पोलिसांनी परवानगी न देता ही पंचायत झाली व शंभरच्या वर दिल्ली पोलिसांनी तेथे उपस्थित राहून देखील पंचायत होऊ दिली व उलट तेथे गेलेल्या पत्रकारांना अटक केली आहे ! व दिल्ली पोलिसांचा लोगो ‘सत्यमेव जयते आहे’ !


तसेच गेल्या आठवडय़ात मी भिवंडीच्या कार्यक्रमानंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव व अजुबाजुच्या काही गावांमध्ये गेलो असताना जे चित्र पाहून आलोय ते फार काळजी करण्या सारखे आहे ! ही बहुसंख्य गावे महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवरील मराठी भाषीक गांवे आहेत ! जेथून कोण्या एकेकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार निवडून येत होते. आता तेथूनच बीजेपी निवडून येत आहे. व तिच गोष्ट तथाकथित महाराष्ट्र एकीकरण समितीचे पुरस्कर्ते देखिल त्यात सामील झाल्या मुळे. त्याच कर्नाटक राज्यातील हिंदुच्या मंदिर परिसरात मुसलमानांना दुकान देऊ नये व आधीच असलेल्या दुकानातून सामान घेऊ नये. असे फतवे काढले जात आहेत. तत्पूर्वी नोव्हेंबर महिन्यात हसन जिल्ह्य़ातील बेलुर नावाच्या गांवात एका चर्च मध्ये घुसून जबरदस्तीने रविवार असल्याने प्रार्थना बंद पाडली. त्यानंतर कोस्टल कर्नाटक मधील उडपी, मंगरूळ, भटकळ इत्यादि ठिकाणी हिजाबच्या मुद्दा घेऊन जबरदस्त मोहीम राबविण्यात आली. ते कमी झाले की काय म्हणून कश्मीरवर सिनेमा ‘कश्मिर फाईल्स नांवाने’ व त्या सिनेमाची जाहिरात पंतप्रधाना पासुन गल्लीबोळातील हिंदुत्ववादी संघटनांनी अक्षरशः मुस्लिम द्वेषाचा प्रचार – प्रसार सुरू केला आहे. म्हणून मला स्वामींनी शिकागोला दिलेल्या 130 वर्षे होत आलेल्या जगप्रसिद्ध भाषणाची आठवण आली. धर्मा-धर्मात भांडणे लावून धर्मवेडेपणाची मृत्यु घंटा शब्द वापरला आहे. तलवार आणि लेखणी यांच्या सहाय्याने (आता डिजीटल माध्यमातून) माणसांच्या केल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या छळांचा अंतिम क्षण जवळ आला आहे. हे आजपासून 130 वर्षे आधीच शिकागोला जागतिक व्यासपीठावर कडाडणारे स्वामी विवेकानंद. यांच्या नावावर हिंदुत्ववादी संघटनांनी गेल्या शंभर वर्षांत या देशात दुसरे काय केले ? म्हणजे कोणते स्वामी विवेकानंद यांनी लक्षात घेतले ?


‘कश्मीर फाईल्स सिनेमा’ पाहून आलेल्या लोकांना सिनेमागृहाबाहेर , थांबऊन माईक हातात घेऊन सांगितले जात आहे ” की काय नुसते सिनेमा पाहून घरी काय जाता ? बदला घ्यायचा आहे !”आणि हाच प्रचार ज्या पद्धतीने पंतप्रधान, भाजपचे मुख्यमंत्री व त्यांच्या अनुयायांनी कश्मीर फाईल्स सिनेमाच्या प्रचारासाठी जी मोहीम सुरू केली आहे. ती समस्त अल्पसंख्यक समुदायाला असुरक्षित मानसिकते मधे अजुन ढकलण्यात येत आहे. आणि हे असेच सुरू राहिले तर संपूर्ण देशात अराजकता माजू शकते !
आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सगळ सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. ज्या पक्षाच्या लोकांनी सत्तेवर येतांना शपथ घेतली आहे ” कि आम्ही यापुढे देशात सत्ता चालवताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता राज्यशकट चालवू !”


आणि पंतप्रधाना पासुन, तथाकथित हिंदु पंचायत व गल्लीबोळातील कार्यकर्ते सध्याच्या काळात फक्त मुस्लिम द्वेषाचे राजकारण करत आहेत. हिंदुंना हातात शस्त्र धारण करून मुसलमानांना मारणे कसे योग्य आहे. असली भाषा एका तथाकथित साध्वी कडून वापरली जाते. आणि शिमोगा पोलिसांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे. आणि पोलिस म्हणतात की या कार्यक्रमाची परवानगी घेतली नाही. मग पोलिसांनी तो कार्यक्रम थांबवणे तर दूरच. उलट त्या कार्यक्रमात वक्ते जे बोलत होते ते अत्यंत आक्षेपार्ह व दोन समाजातील सौहार्द बिघडणारे भाषणे झाली. उलट तो कार्यक्रम कवरेज करायला गेलेल्या पत्रकारांशी हाणामारी झाली व त्यांच्या कॅमेरा व इतर सामानांची मोडतोड केली आहे व हे सर्व पोलिसांच्या देखत. आणि पोलीसांनी पत्रकारांनाच ताब्यात घेतले .
बीजेपी ला तात्कालिक सत्ता मिळाली आहे ! पण 140 कोटी लोकांचे खरे प्रश्न काय आहेत ? ते सोडून गेले आठ वर्षे फक्त धर्माच्या आधारावर संपूर्ण देशात ध्रुवीकरण सुरू आहे. आणि तेही भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी मध्ये !
भारतातील अल्पसंख्यक समुदायांना सतत भीतीच्या मधे ठेवणे म्हणजे भारतीय समाजस्वास्था सोबत व राष्ट्रीय एकात्मतेचा खेळ खंडोबा चाललेला आहे !
बीजेपी वा त्यांची मातृसंघटना उठसूट स्वामी विवेकानंदापासून, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आडोशाला घेऊन आपल्या प्रचाराचा भाग म्हणून उपयोग करत आहेत. पण या सगळ्या लोकांनी भारतीय लोकांबद्दल काय सांगितले आहे ते नेमकं टाळून वापर करणे सुरू आहे !


विवेकानंदांच्या धर्मसंसदेतील भाषणात दिलेल्या इशारा दिला असुनही त्याच्या उलट वागणूक सुरू आहे. मी मुद्दाम माझ्या लेखाची सुरूवात स्वामी विवेकानंद यांच्या अमेरिकेत दिलेल्या भाषणा पासुन सुरु केलीय. त्यातील exclusion या इंग्रजी शब्दाचा यथोचित समाचार घेतला आहे. जगातल्या सर्वात जुन्या आणी सुसंस्कृत भाषेत हा शब्द नाही आहे. आणि कुठल्याही भाषेत असता कामा नये कारण exclusion चा अर्थ वगळणे आहे. जे सर्वस्वी मानवी संस्कृतच्या विरोधी आहे. जे कुठल्याही समाजात नसाव. हे आर्ततेने बोलणारे विवेकानंद त्यांच्या आरत्या करण्यात गुंतलेल्या संघाच्या मंडळींना झाले काय ? गेल्या शंभर वर्षांपासून या मंडळींनी फक्त आणि फक्त वगळण्यात. आणि तेही दलित, आदिवासी, आपल्याच स्त्रियांना व अल्पसंख्यक समुदायांना व अलिकडे त्यांच्या या चुकीच्या मार्गाला विरोध करणारे लोक मग भले ते हिंदू धर्मातील का असेना, महात्मा गांधी हे पहिले वगळण्याच्या राजकारणाचे बळी घेतले. नंतर पंच्याहत्तर वर्षांत लाखो लोक बळी घेतले. ज्यामध्ये प्रसिद्ध नांव डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रोफेसर कलबुर्गी, गौरी लंकेश व काॅम्रेड गोविंद पानसरेजी व अल्पसंख्यक समुदायांना भागलपुर, गुजरात, उत्तर पूर्वी प्रदेश व समस्त रेड कॅरिडार मधील दलित, आदिवासी, जम्मू आणि काश्मीर राज्यातील किती लोकांना वगळता. आता पुन्हा एकदा ‘कश्मीर फाईल्स’ सारखे सिनेमे दाखवून सध्या वगळण्याचाच कार्यक्रम सुरू आहे. आणि हे असेच चालणार असेल तर मग भारतात गृहयुद्ध सुरू झाले तर आस्चर्य वाटायला नको ! म्हणूनच स्वामी विवेकानंद यांनी 130 वर्षांपूर्वीच वगळणे हा शब्द जगातील कोणत्याही भाषेत असता कामा नये. हे जागतिक पातळीवर ठणठणीत शब्दात सांगितलं, म्हणून तर तेथे जमलेल्या हजारो लोकांना ते एवढं आवडल. की स्वामी विवेकानंद त्या भाषणा नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता पावलेले पहिलेवहिले भारतीय आहेत .
तसेच या मंडळींनी धर्मांतराचा मुद्दा, जबरदस्तीने धर्मांतर झाले आहे हे धादांत खोटे असल्याचे स्वतः स्वामी विवेकानंद यांनी सांगितले आहे “कि भारतात झालेल्या धर्मांतराचे खरे कारण हिन्दु धर्मातील जाति-व्यवस्था मुख्य कारणीभूत आहे. ज्याचा धडधडीत पूरावा म्हणजे. विवेकानंद यांच्या अमेरिकेत दिलेल्या भाषणा पासुन. 11 सप्टेंबर 1893 रोजी दिलेल्या, त्रेचाळीस वर्षे पूर्ण होत नाहीत तर, जे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी 1936 ला येवला येथील सभेत जाहीर केले. “की मी हिंदु धर्मात जन्मला आलो असलो तरी मरण्यापूर्वी हिंदु धर्माचा त्याग केलेला असेल” !


एवढ्या टोकाला जाऊन ही घोषणा करण्याची कारणे, तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी कधी विचारात घेऊन या निर्णयापासुन बाबा साहेब आंबेडकर यांना परावृत्त करण्यासाठी काय केले ? आणि जवळपास वीस वर्षा नंतर डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी नागपुरात 14 आक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांना सोबत घेऊन धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित केला होता. जे स्वतः स्वामी विवेकानंद यांनी सत्तर वर्षे आधीच सांगितले आहे . की भारतीय धर्मांतराचे खरे कारण अस्पृश्यता.
हेच कारण हजारो वर्षांपासून दलित व इतर जातींवर फक्त ते जन्माने कनिष्ठ जातिचे आहेत म्हणून. त्यांना ज्ञान संपादन करण्यास मनाई व मंदिरात प्रवेश नाही सत्ता संपत्तीत वाटा नाही. तरीही त्यांनी “ठेविले अनंते तैसेची रहावे” ? बाबा साहेब आंबेडकर यांनी मुकनायक नांवाने एक वर्तमानपत्र 31 जानेवारी 1920 रोजी सुरू केले होते. त्याच्या पहिल्याच अंकात बाबा साहेब आंबेडकर यांनी हिंदु समाज हा एक मनोरा असुन मनोऱ्याचा एक – एक मजला म्हणजे एक – एका वर्णाच नांव आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे या मनोऱ्याच्या या सगळ्या मजल्यावर जाण्यासाठी पायर्‍याच नाहीयेत. त्यामुळे एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर जाण्यासाठी मार्ग नाही. ज्या मजल्यावर तो जन्मला त्याच मजल्यावर त्याने मरावे.खालच्या मजल्यावरील माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यावर प्रवेश नाही. व वरच्या मजल्यावरील माणूस कितीही नालायक असेल तरी त्याला खाली लोटून देण्याची कुणाचीही छाती नाही. मग भले ते छप्पन – छप्पनचा मंत्र जपणारे असोत. हिंदु समाज व्यवस्थेचे एवढे विदारक सत्य यापूर्वी कुणीही रेखाटले नाही. पुढच्या भागात बाबा साहेब लिहितात की या सगळ्या व्यवस्थेकडे स्थितप्रज्ञपणे पाहणारे या व्यवस्थेच्या दुष्परिणामांपासुन वाचु शकत नाही, असे बाबा साहेबांचे सांगणे होते.


मुकनायकाच्या प्रथम अंकातच ते लिहितात ” की एखादी जात अवनत झाली, तर तिच्या अवनतीचा चट्टा, इतर जातीस बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही एक नौकाच आहे, ज्याप्रमाणे आगबोटीत बसुन प्रवास करणाऱ्या उतारूने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून किंवा इतर प्रवाशांची त्रेधातिरपीट कशी उडते ही गंमत पाहण्यासाठी म्हणा, किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे, जर का इतरांच्या खोलीस. छिद्र पाडले, तर सर्व बोटी बरोबर त्यालाही, आधी नाही पण मागाहून का होईना जलसमाधी घ्यावी लागणार आहे. सध्याच्या हिंदुत्ववादी संघटनांनी बाबा साहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे तसेच गेल्या काही वर्षांपासून सुरू केले आहे. व या वेड्याचाराचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावा लागतो आहे.
आज पासुन 100 दिवसांच्या आत बाबा साहेब आंबेडकरांची 132 वी जयंती येत आहे. तर महार जातीत १४ एप्रिल १८९१ रोजी जन्मलेला भिमा, जन्म झाल्यावर बालपण खेळ, शिक्षण घेत असताना, आपल्या सोबत तथाकथित उच्च जातिचे लोक कसे तुच्छतेने वागत होते. ती अत्यंत अपमानास्पद वागणूक सहन करतच वाढत होता. वर्गाबाहेर बसुन आभ्यास करण्यापासून तर पाणी प्यायला व जेवणाच्या डब्याला वेगळा ठेवण्यापासुन. तर परदेशी शिक्षण घेऊन आल्यावर बडोदे संस्थानचे कर्मचारी म्हणून काम करत असताना. त्यांना राहण्यासाठी एका पारशी लाॅज मधुन, महार जातीचे आहेत हे कळल्यावर. इतर राहणाऱ्या लोकांनी आक्षेप घेतला व बाबासाहेब आंबेडकरांनी ती लाॅज सोडून कुठेच जागा मिळाली नाही. म्हणून बडोदे सोडून आले. भारताचे मजूर मंत्री झाले. पण फाईल्स आणून देणारा शिपाई त्या फायली नम्र पणे न देता अलगत फेकुन देत होता. दोन परदेशी विद्यापीठाच्या डॉक्टरेट, बॅरिस्टर. कदाचित त्या वेळी मंत्री मंडळाचे कुठल्याही मंत्र्याचे एवढे शिक्षण झाले नसेल. पण डॉ. बाबा साहेब अंबेडकरजी जन्मना मनुस्मृतिच्या अनुसार. पायाच्या अंगठ्या पासुन जन्म झालेल्या शुद्र जातीतल्या महार जातीत जन्माला आले, म्हणून ही वागणूक ?

मंदिरात प्रवेश नाही, सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी घेता येनार नाही, न्हावी कटिंग करनार नाही, हाॅटेल मधे वा तथाकथित उच्च जातीच्या लोकांकडे गेले तर वेगळा कप वा भांड्यातले चहा प्यायला मिळेल. हजारो वर्षे या पद्धतीने समस्त अस्पृश्य जातीतल्या लोकांना. पदोपदी आपण क्षुद्र आहोत, हे जाणवले म्हणून, पंधराशे वर्षांपूर्वी बरेच जण हिंदु धर्माचा त्याग करून. कोणी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तर कोणी इस्लाम, तर डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांनी 1956 ला आपल्या लाखों अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला आहे. आणि ही घटना भारतीय स्वातंत्र्याच्या नऊ वर्षांच्या कालावधीत झाली. व ज्या हिंदुत्ववादी संघटनेचे मुख्यालय असलेल्या गावांमध्ये नागपुरातील घटना आहे. व तो दिवस संघाच्या स्थापनेचा पण आहे. विजया दशमी म्हणजे दसरा. 14 आक्टोबर 1956. आज या घडीला सदूसष्ट वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढे ढळढळीत उदाहरण समोर असताना, हिंदुत्ववादी मंडळी अल्पसंख्यक समुदायांना सतत लक्ष करत आहेत. स्वामी विवेकानंदापासून डॉ. बाबा साहेब अंबेडकरांच हिंदु धर्म सोडून इतर धर्मात जाण्याची कारणे, उघड उघड दिसत असुनही. अल्पसंख्यक समुदायांना सतत भीतीच्या मानसिकते मधे टाकून काय साधत आहेत ? 14 अॉगस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी विभाजनाचा दिवस साजरा करायची घोषणा करून बसले आहेत. चांगलीच गोष्ट आहे, मी मनःपूर्वक स्वागत करतोय. कारण आज या घडीला पाकिस्तान – पाकिस्तानच्या मंत्रावरच नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्ली गाठली आहे. जर का फाळणी झाली नसती तर भारतीय जनता पक्षाच्या अस्तित्वात येण्याच काहीही कारण नव्हते. फक्त हिंदू – मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी इकडे बीजेपी व तिकडे पाकिस्तान मध्ये मुस्लिम लीग दोन्ही एकमेकांची भिती दाखवूनच आपल राजकारण करीत आहेत. जर का पाकिस्तानची निर्मिती झाली नसती तर भारतीय जनता पक्षाचे अस्तित्वात येण्याची शक्यता नव्हतीच. बीजेपीची सगळी मदार पाकिस्तानच्या निर्मिती करण्यात आली आहे म्हणून आहे विभाजन दिवसाच पाखंड तेवढ्याच साठी आहे. यानिमित्ताने फाळणीच्या खऱ्या कारणांची मिमांसा करायला मिळेलच व संघाचे ढोंग लोकांना दिसेल म्हणून मी स्वतः या घोषणेच स्वागत केले आहे !
डॉ. सुरेश खैरनार 12 जानेवारी 2023, नागपुर

Adv from Sponsors